
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील नामांकित ग्रामीणभागात उच्च दर्जाचे संगणक प्रशिक्षण देणाऱ्या श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन या प्रशिक्षण केंद्रात एम एस सी आय टी (MS-CIT) चे प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी व पालकांचा मेळावा व १० वी शालांत प्रमाणपत्र परिक्षेतील परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील चिंचोली माळी सारख्या ग्रामीण भागात एमकेसीएल चे अधिकृत अध्ययन केंद्र श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशनच्या माध्यमा तून व एमकेसीलचे जिल्हा समन्वयक श्री. विठ्ठल पांचाळ सर यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या संगणकीय कोर्सेसच्या माध्यमातून संगणकीय साक्षरता मोठ्या प्रमाणात राबविण्याचे काम संचालक अनिल गलांडे हे करीत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून सध्या एम एस सी आय टी (MS-CIT) करीत असलेल्या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य व्यवसायात तसेच छोट्या मोठ्या नोकरीस उपयुक्त क्लीक (Klic) Knowledge lit Carrier कोर्सेस ची जनजागृती होऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ व्हावा म्हणून पालक मेळावा घेवून याविषयीं मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून सौ.रेश्मा गायकवाड या होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून सौ.कोमल कापरे,सौ. प्रियंका शिंदे,सौ.वैष्णवी काळे,कु.सायली गायकवाड,श्री संस्कार एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष अनिल गलांडे हे होते.
यावेळी बोलताना सर्व अध्यक्ष व सर्व प्रमुख पाहुणे यांनी संगणकीय शिक्षणाचे महत्व विषद केले व १० वी शालांत प्रमाणपत्र परिक्षेतील संविधान शाहू तुपारे, रोहित महादेव गायकवाड,साक्षी संजय मेहरकर,स्वाती गोकुळ सारुक, फातेमा खाजा शेख,साक्षी दशरथ गव्हाणे या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुषपगुच्छ व सन्मानचिन्ह देवून यथोचित सन्मान करण्यात आला तर किशोर विक्रम हांगे, राधाराणी मधुकर निंगुळे,तुळशीदास अशोक काळे,वैष्णवी राजाभाऊ माने, अभिषेक बालाजी राऊत,आदित्य बालाजी राऊत,तनुजा जगन्नाथ वनवे,श्रेया संजय शिंदे,सोनम कादिर पठाण,नाजिया जिलानी तांबोळी, आरशिया मुस्तफा तांबोळी,विराट सूर्यकांत घोडके,आदर्श उत्तरेश्वर तुपारे,मानसी दिपक बजगुडे,पूजा बालासाहेब मावकर,अभिषेक दीपक भांगे,शिवम भास्कर बर्डे, विश्वदीप वैजनाथ शिंदे, रेहान ऐंनोद्दीन शेख, वैष्णवी आश्रुबा बजगुडे, अर्पिता आश्रुबा बजगुडे या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व पदक देऊन सन्मान करण्यात आला. व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन श्री संस्कार एज्युकेशन ग्रुप चे अध्यक्ष अनिल गलांडे यांनी केले तर या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रशिक्षक अदित्य गलांडे,अमोल गलांडे, संचित गलांडे यांनी परिश्रम घेतले.या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.



