राजकीयसामाजिक

महात्मा फुले २०० वी जयंती उत्सव: काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र भर 20 जाहीर सभा सोबतच राहुलजी गांधी यांच्या उपस्थितीत नायगाव सातारा येथे सांगता सभेचे आयोजन

मुंबई/प्रतिनिधी

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आगामी २०० व्या ऐतिहासिक जयंतीचे औचित्य साधून,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात हा उत्सव अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्याचा संकल्प प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व समितीचे अध्यक्ष भानुदास माळी यांच्या प्रमुख उपस्थित मुंबई येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे.या बैठकीमध्ये महात्मा फुलेंचे विचार आणि त्यांचे महान कार्य जनमानसात प्रज्वलित करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात वैचारिक प्रबोधनाचा भव्य आराखडा तयार करण्यात आला आहे.

राष्ट्रीय व प्रांतीय नेतृत्वाचे लाभले मार्गदर्शन

या महत्त्वपूर्ण बैठकीत उत्सव समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माननीय भानुदासजी माळी यांनी संपूर्ण महोत्सवाचे नेटके नियोजन व रूपरेषा मांडली.यावेळी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी विदर्भाचेनिरीक्षक तथा राजस्थानचे आमदार कुणालजी चौधरी,उपाध्यक्ष अॕड. गणेश पाटील यांनी उपस्थित राहून उत्सव समितीला अत्यंत मोलाचे व दिशादर्शक मार्गदर्शन केले.

वर्ध्यापासून रणशिंग फुंकणार; २० जाहीर सभा व १ सांगता सभेचे आयोजन

महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर करण्या साठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय व स्थानिक नेत्यांच्या प्रमुख २० जाहीर सभांचे भव्य नियोजन करण्यात आले आहे.असून या संपूर्ण अभियानाची पहिली ठिणगी १८ जून रोजी वर्धा येथे पडणार आहे. उत्सव समितीचे अध्यक्ष भानुदासजी माळी यांच्या नेतृत्वाखाली ही पहिली जाहीर सभा मुकुल वासनिक जी,हर्षवर्धन सपकाळ साहेब,विजय वडेट्टीवारजी,नानाभाऊ पटोले आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक रित्या पार पडेल.

केंद्रीय नेतृत्वाची साथ:

देशाचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत जी यांच्यासह अनेक केंद्रीय नेत्यांना सोबत घेऊन हा जयंती उत्सव आणि महात्मा फुलेंचे कार्य तळागाळा तील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा दृढ निश्चय या बैठकीत करण्यात आला.

सातारा (नायगाव) येथे होणार ऐतिहासिक सांगता सभा

या संपूर्ण अभियानाचा सुवर्णकलश क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव जिल्हा सातारा येथे भव्य सांगता सभेने होणार आहे.या महा सभेसाठी देशाचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते जननायक राहुलजी गांधी,ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत,मुकुल वासनिक,प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, नानाभाऊ पटोले यांच्या सह देशभरातील प्रमुख ओबीसी नेत्यांना आमंत्रित करण्याचा ऐतिहासिक निर्णय या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला.

प्रमुख पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती

या विचारमंथन बैठकीला महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून आलेले काँग्रेसचे प्रमुख शिलेदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.यामध्ये प्रामुख्याने नंदकुमार सर्जेराव कुंभार (प्रदेश सरचिटणीस),विजय राऊत (नाशिक), कांचनकुमार चाटे (छत्रपती संभाजीनगर) राजू घुटे (बुलढाणा), वसंत मुंडे (बीड),पांडुरंग कुंभार प्रदेशसचिव (धाराशिव),शंभू म्हात्रे (पनवेल),धनराज राठोड प्रदेश सचिव (नांदेड), सुरेश पाटील खेडे (ठाणे) अशोक खलाणे (जळगाव),दिपक गायकवाड (सांगली) यांच्यासह महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि इतर प्रमुखलोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही बैठक अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडली. या भव्य आयोजनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात महात्मा फुलेंच्या विचारांचे एक नवे वादळ निर्माण होणार,असा विश्वास सर्व नेत्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!