दलीत चळवळीतील जेष्ठ नेते बाबुराव गालफाडे सर यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त केज येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

केज/प्रतिनिधी
दलीत चळवळीतील ज्येष्ठ नेते झोपडपट्टी हक्क संघर्ष समिती, बहुजन ज्येष्ठ नागरिक मंच आणि बहुजन क्रांती मोर्चाचे मार्गदर्शक बाबुराव गालफाडे सर यांच्या ६४ व्या वाढदिवसा निमित्त मंगळवार,दिनांक ०२ जून २०२६ रोजी केज शहरात विविध सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मित्र व परिवाराच्या वतीने हा वाढदिवस साजरा केला जाणार आहे.वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची रुपरेषा खालीलप्रमाणे आहे
सकाळी ठीक १०-०० वाजता उपजिल्हा रुग्णालय,केज येथे रुग्णांना फळे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत दिवसाची सुरुवात केली जाईल.दुपारी १२-३० वाजता प्राईम हॉटेल, शिवाजी चौक,केज येथे गालफाडे सरांचा अभीष्टचिंतन सोहळा पार पडणार आहे.या कार्यक्रमास झोपडपट्टी हक्क संघर्ष समिती, बहुजन ज्येष्ठ नागरिक मंच,बहुजन क्रांती मोर्चाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,सरांचे स्नेही, मित्रपरिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.तरी सर्व हितचिंतकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



