शैक्षणिकसामाजिक

केज तालुक्यातील कोरडेवाडी च्या विशाल यादवची मुंबई पोलीस दलात निवड ;ग्रामस्थां कडून जंगी सत्कार संपन्न 

केज/प्रतिनिधी

तालुक्यातील कोरडेवाडी येथील भूमिपुत्र विशाल दशरथ यादव याची मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर निवड झाल्याबद्दल कोरडेवाडी ग्रामस्थ आणि नातेवाईकांच्या वतीने त्याचा जाहीर नागरी सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणाने आपल्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केल्यामुळे संपूर्ण परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला सोहळा

या सत्कार समारंभासाठी राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रा तील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून विशाल ला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यामध्ये प्रामुख्याने शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड, ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक दत्ता दराडे सर, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते गोवर्धनभोसले, डॉ.धनराज पवार,अंकुश कलाने स्थानिक लोक प्रतिनिधी सरपंच नंदूबाई कोरडे, शिक्षण व इतर क्षेत्रातील मान्यवर हनुमंत गित्ते सर,हिराबाई पवार मॅडम,घाडगे सर मुंबई पोलीस दलातील सहकारी स्वप्निल चिंचकर मुंबई पोलीस गावातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक गंगाधर महाराज यादव, सुरेश यादव,अनिल कोरडे, दत्ता वरपे,किशोर देशमुख,अशोक भोसले, उत्तरेश्वर यादव,अशोक वरपे,नामदेव पवार, सतीश धूमक,बाजीराव कोरडे,मारुती तेरवे, मदन यादव,पोपटसावंत, जेजेराम पवार,हनुमंत हावळे,दत्ता यादव आदि मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण भागातील तरुणांसाठी आदर्श यावेळी बोलताना मान्यवरांनी विशालच्या संघर्षाचे कौतुक केले. ग्रामीण भागात राहून, सोयी-सुविधांचा अभाव असतानाही केवळ कठोर परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर विशालने मिळवलेले हे यश इतर तरुण तरुणीं साठी नक्कीच प्रेरणा दायी ठरेल,असा सूर यावेळी उमटला.

विशालने मिळवलेले यश हे केवळ त्याचे नसून संपूर्ण कोरडेवाडी गावाचा गौरव आहे. त्याच्या या यशामुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे,अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. यासत्कार सोहळ्यासाठी कोरडेवाडी व परिसरा तील नागरिक,तरुण वर्ग तसेच विशालचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करून सांगता करण्यात आली.सर्व उपस्थितांनी विशाल यादव आणि त्याच्या कुटुंबीयांचे पुष्पहार घालून व पेढे भरवून अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!