काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत -राहुल सोनवणे

बीड/प्रतिनिधी
बीड जिल्हातील सर्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सुचने नुसार प्रदेश काँग्रेस कमिटीचे समन्वयक तथा निरिक्षक श्री.एम.एम.शेख (माजी आमदार),श्रीमती विद्याताई पाटील,श्री. सुरेंद्रजी घोडजकर व जिल्हाध्यक्ष श्री.राहुल सोनवणे यांच्या उपस्थिती मध्ये सर्व मुख्य जिल्हा / तालुका / शहर अध्यक्ष,युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष, एन एस यु आय जिल्हा अध्यक्ष,महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्ष,सेवा दल जिल्हा अध्यक्ष, अनुसूचित जाती विभाग जिल्हा अध्यक्ष एस सी, आदिवासी काँग्रेस एस टी जिल्हा अध्यक्ष,इतर मागासवर्गीय विभाग ओबीसी जिल्हा अध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग जिल्हा अध्यक्ष,विमुक्त जाती व भटक्या जमती व्हीजेएनटी विभाग जिल्हा अध्यक्ष,सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष इत्यादी सेल या सर्व निवडी होणार आहेत
इच्छुकांनी विहित अर्ज नमुन्यातील अर्ज सविस्तर माहिती भरुन बायो-डाटा सह जिल्हा उपाध्यक्ष श्री.प्रविण कुमार शेप यांचे कडे प्रत्यक्ष अथवा पिडीएफ जमा करावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी केले आहे.संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९४२३४७२१०९, ८८०५२५५०५५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.



