सिद्धिविनायक मंदिर वकीलवाडी केज येथे अक्षयतृतीयाच्या शुभ मुहूर्तावर पाणपोई चा शुभारंभ

केज/प्रतिनिधी
केज शहरातील सिद्धी विनायक मंदिर वकीलवाडी येथे अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर पाणपोईचा शुभारंभ जेष्ठ नागरिक श्रीहरी शेठ टांकसाळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. वैशाख महिन्यात सुर्य आग ओकत असुन नागरिकांच्या अंगांची लाहीलाही होत आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.याचा विचार करून सिद्धीविनायक मंदिराचे पुजारी श्री.अनंत देवा कोकिळ, भुतडा सेठ, मंदार भैय्या देशपांडे, रोहन वेदपाठक,श्रीधर नाना खोत यांनी चर्चा करून अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर पाणपोई सुरू करण्याचा निर्णय घेतला.
या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असुन येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.यामुळे नागरिकांना कर्कश्य उन्हाळ्यातही पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी पाणपोई चालू केल्याबद्दल सिद्धी विनायक मंदिर ट्रस्टच्या सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत.



