डॉ.गीता शिनगारे यांनी एमबीबीएस पदवी प्राप्त केल्याबद्दल जिजाऊ परिवाराकडून भव्य सत्कार,मराठा सेवा संघ बीड जिल्हा व राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आवसगाव यांच्या वतीने आयोजन

केज/प्रतिनिधी
मौजे आवसगाव ता.केज जि.बीड येथे दि.१६ एप्रिल वार गुरूवार रोजी राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आवसगाव,मराठा सेवा संघ बीड जिल्हा तसेच जिजाऊ परिवाराच्या महिला पदाधिकारी यांच्या वतीने औक्षण करून एमबीबीएस पदवी संपादन करणाऱ्या गुणवंत कु.डॉ. गीताताई बन्सी (आण्णा) शिनगारे यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
डॉ.गीताताई शिनगारे यांनी अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस ही पदवी गुणवत्तेसह उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल गावात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून,त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी मुख्य आयोजक गोविंद नाना शिनगारे,संतोष बापू शिनगारे आणि श्री. सुरेशराव खाडपे यांच्या हस्ते आदर्श प्रेरणास्थान स्वराज्य प्रेरणा राजमाता जिजाऊ माँसाहेबांची भव्य प्रतिमा,शाल व पुष्पहार देऊन डॉ. गीताताई यांचा सन्मान करण्यात आला.तसेच त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमास डॉ.गीताताई यांचे पालक श्री.बन्सी (आण्णा) शिनगारे यांच्यासह संपूर्ण शिनगारे परिवार उपस्थित होता. याशिवाय गावातील मान्यवरांमध्ये श्री.भारत दादा शिनगारे, श्री.सुरेश खाडपे,श्री.काशिनाथ बाबा साखरे, श्री.गोविंद पवार (माजी सरपंच), श्री.विजयसिंह साखरे, श्री.कृष्णा साखरे, अॅड. सयाजी साखरे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे अध्यक्ष श्री.आकाश भैय्या आदमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी डॉ.निता शिनगारे यांनी मनोगत व्यक्त करताना डॉ.गीताताई यांच्या यशामागे त्यांच्या आई- वडिलांचे परिश्रम, कुटुंबीयांचे पाठबळ तसेच गुरुजनांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे असल्याचे नमूद केले.
त्यांनी या सर्वांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.तसेच जिजाऊ परिवारातील सदस्य संतोष बापू शिनगारे आणि गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास शोभा आणली.या सत्कार सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी डॉ.गीताताई शिनगारे यांच्या यशाचे कौतुक करताना,त्यांनी भविष्यात आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजाची सेवा करण्यासाठी तत्पर असावे असे मनोगत प्रसंगी सांगितले व गोविंद नाना शिनगारे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आवसगाव व मराठा सेवा संघ बीड जिल्हा सह जिजाऊ परिवाराच्या वतीने सत्कार केल्याबद्दल डॉ. गिता शिनगारे यांनी मनःपूर्वक आभार मानले संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.



