
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील श्री संत नामदेव महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिंचोली माळी या पतसंस्थेची सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधी करिता नव निर्वाचित संचालका मधून प्राधिकृत निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वहावळे एम.एस यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळ,चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची बिनविरोध निवड यशस्वीरित्या पार पडली.संस्थेचा योग्य रितीने आर्थिक कारभार सुरळीत चालूअसल्यामुळे संस्थेने अनावश्यक खर्च टाळून निवडणूक बिन विरोध करण्यात आली.
चेअरमनपदी श्री.फाटक गणेश सखाहरी तसेच व्हाईस चेअरमनपदी श्री. कांबळे दत्तात्रय हरिकिशन यांची सन २०२६-२०३१ या कालावधी करता निवड करण्यात आली.याप्रसंगी संस्थेचे संस्थापक श्री. नंदकिशोर इंगळे यांनी ग्रामीण भागातील व्यक्तींना काटकसर करून बचतीची ची सवय लावणे व ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्ती आर्थिक साक्षर करणे या उद्देशाने संस्थेची निर्मिती व संस्थेचे आर्थिक हित लक्षात घेऊन सदरची निवडणूक बिनविरोध केल्याचे सांगितले तसेच खोडसे सी.ए.प्रमाणित लेखा परीक्षक यांनी ठेवी सुरक्षितता,वैधानिक कर्ज प्रकरणी बाबत घ्यावयाची दक्षता,तसेच संचालक ठेव ठेवण्याबाबत मार्गदर्शक अशा सूचना देऊन संस्थेच्या आर्थिक यशस्वी वाटचालीसाठी व नवनिर्वाचित संचालकाचे पदाधिकाऱ्याचे मनःपूर्वक शुभेच्छा देऊन यशस्वी रित्या आर्थिक कामकाज करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या तसेच निवडणूक अधिकारी श्रीमती वहावळे एम.एस. यांनी संस्थेने अनावश्यक खर्च टाळून बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे सदर संस्थेचे कौतुक करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.तसेच नव निर्वाचित पदाधिकाऱ्याचे व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
समारोप प्रसंगी उपस्थित सर्व नवनिर्वाचित संचालक १. श्री.नंदकिशोर शहाजीराव इंगळे २.श्री.अशोक निवृत्ती बर्डे ३.श्री.रामदास हरिदास सपाटे ४.श्री. विलास अशोकराव पवार ५.श्री.निखिल नंदकिशोर इंगळे ६.शशिकांत शहाजीराव इंगळे ७. श्रीमती सारिका नंदकिशोर इंगळे ८. श्रीमती आशा महारुद्र सारूक ९.श्रीमती सुनीता शशिकांत इंगळे तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित गावातील जेष्ठ मंडळी श्री.ज्ञानोबा श्रीपती सारुक,श्री हरी किशन लक्ष्मण कांबळे, श्री.बोराडे,श्री.गव्हाणे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन श्री.खोडसे साहेब यांनी केले व आभार प्रदर्शन संस्थेचे व्यवस्थापक श्री विनायक पाळवदे यांनी केले.संस्थेचा कर्मचारी वर्ग यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.



