
बीड/प्रतिनिधी
केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार रासायनिक खताच्या वितरणात पारदर्शकता आणण्या साठी फार्मर आयडी प्रणाली राबवण्यात येत आहे.याशिवाय फार्मर आयडी असल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्याला रासायनिकखत मिळणार नाही.जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी शासनाच्या या उपक्रमास सहकार्य करून फार्मर आयडीची तात्काळ नोंदणी करावी जेणेकरून खत वितरण सुरळीत व पारदर्शकपणे होईल असे आवाहन ग्रामीण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा बीड जिल्हा सहकार व राज्यसंचालक प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी केले आहे.फार्मर आयडी अनिवार्य आहे. शेतकऱ्यांना खत खरेदी साठी फार्मर आयडी काढणे बंधनकारक आहे फार्मर आयडी शिवाय खत वितरण केले जाणार नाही.
अनुदानित खतासाठी सक्ती
रासायनिक खतावरील अनुदानाचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे खताचा काळाबाजार व अनावश्यक लिंकिंग रोखण्यासाठी ही प्रणाली प्रभावी ठरेल.पारदर्शक व नियोजनबद्ध वितरण सुनिश्चित होईल. डिजिटल नोंदणी प्रणाली शेतकऱ्याची माहिती (जमीन,पीक,योजना) डिजिटल स्वरूपात नोंदवली जाईल खत खरेदी करताना आयडी स्कॅन / क्रमांक वापरला जाईल.थेट लाभ हस्तांतरण खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल ही तर शासकीय योजनां साठी फार्मर आयडी आवश्यक राहील. जिल्ह्यात फार्मर आयडी नोंदणी मोहीम सुरू आहे.
सर्व तालुक्यांमध्ये जनजागृती व नोंदणी शिबिर या आयोजित करण्यात येत आहेत फार्मर आयडी कसा काढावा ग्रामपंचायत कार्यालय सीएससी (कॉमन सर्विस सेंटर) सहाय्यक कृषी अधिकारी /कृषी विभाग कार्यालय शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी खत खरेदी करताना आयडी सोबत ठेवावा अधिक विक्रेत्या कडूनच खत खरेदी करावे व बिल घ्यावे खरीप हंगाम २०२६ पासून हा नियम काटेकोरपणे लागू केला जाणार आहे याची शेतकऱ्याने दखल घ्यावी सहकारी संस्था व खाजगी विक्रेत्यामार्फत ही याच नियमानुसार खत वितरण होईल असे आवाहन ग्रामीण युवक संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.



