अपघात

खाजगी बसचा केज ते मांजरसुंबा रोडवरील सारणीच्या पुलावर अपघात,२२ प्रवासी जखमी,अपघाता नंतर खाजगी बस जळून खाक बसचा नंबर सुध्दा दिसेना १९ जखमी प्रवाशांवर अंबाजोगाईत उपचार सुरु 

केज/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील केज- मांजरसुंबा रोडवरील सारणीच्या पुलावर वळण घेताना एक खाजगी बस पलटी होताच खाजगी बसने पेट घेतला.या बसमधील २२ प्रवाशी जखमी झाले.या अपघाताची माहिती रात्रीची गस्त घालणा-या केजपोलीसांना मिळताच त्यांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमीना धीर देत रुग्ण वाहिकेच्या मदतीने केज येथील उपजिल्हा रुग्णालयात जखमी प्रवाशांना पाठवले.

यातील ३ तीन रुग्णांना उपचार करुन त्यांना सुट्टी दिली तर १९ रुग्णांना पुढील उपचारा साठी अंबाजोगाई येथे पाठवले आहे.सुदैवाने या अपघातात व आगीत जीवित हानी झाली नाही.बीड जिल्ह्यातील केज-मांजरसुंबा रोड वरील सारणीच्या पुला वरील वळणावर दि.१६ मार्च,सोमवार रोजी मध्यरात्री २:३० वाजण्याच्या सुमारास जळगावहून लातूरकडे जात असलेली भरधाव वेगातील खाजगी बस चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाली.बसमधील जखमी प्रवासी बाहेर पडत असताना बसने पेट घेतला.मात्र सुदैवाने या आगीत जीवित हानी झाली नाही.

या अपघाताची माहिती केजचे पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांना मिळताच त्यांनी रात्र गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाला. माहिती देताच पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इमानदार व चालक सहाय्यक पोलिस उप निरीक्षक शंभुदेव दराडे हे तत्काळ अपघातस्थळी हजर होऊन त्यांनी रुग्ण वाहिकेशी संपर्क साधला.पोलिस,रुग्ण वाहिका चालक सुमित तेलंग,त्याचे इतरसहकारी आणि गावकऱ्यांच्या मदतीने प्रवाशांना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढण्यात आले. अपघातात २२ प्रवाशी जखमी झाले होते. यातील ३ तीन जखमी रुग्णावर उपचार करुन सुट्टी दिली तर १९ रुग्णांना पुढील उपचारा साठी अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.

अपघात ग्रस्ताने ट्रॅव्हल्स बसने घेतला पेट बस जुळून खाक – अपघातात पलटी झालेल्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या लक्झरी बस मधून जखमी प्रवाशांना बाहेर काढले जात असतानाच घर्षणामुळे निर्माण झालेल्या उष्णतेने बसने पेट घेतला आणि गाडीच्या इंधनाची टाकी फूटल्याने आग भडकून बस पूर्णतः जळून खाक झाली.

दी बर्निंग बसचा थरार !  

बसला प्रचंड मोठी आग लागल्याने आग आटोक्यात आणण्याची संधी मिळाली नाही.या आगीमुळे रोडवर मध्यरात्री दी बर्निंग बसचा थरार पहायला मिळाला.

प्रवाशांचे सामान जळून खाक – 

बसने पेट घेतल्याने प्रवाशांचे सामान जळून खाक झाले.

पोलिस आणि रुग्णवाहिका चालक यांची तत्परता –

अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि रुग्णवाहिकाचा चालक व सोबतचे कर्मचारी यांनी अपघातस्थळी तात्काळ हजर होत जखमींना बाहेर काढले.

जखमीवर उपचार सुरू – अपघातील २२ जखमी प्रवाशांवर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या स्टाफने प्रथमोपचार करून संदर्भीय उपचारा साठी १९ रुग्णांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले असुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!