सामाजिक

केज येथे सामाजिक न्याय मंत्री ना.संजय शिरसाट यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार संपन्न 

केज/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना.श्री.संजय शिरसाट, मराठवाडा सचिव श्री. अशोक पटवर्धन, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.सचिन मुळूक तसेच श्री.बाळासाहेब सानप हे केज येथे सदिच्छा भेटी साठी रविवार दि.१५ मार्च रोजी आले असता त्यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या तथा माजी आमदार सौ.संगीताताई ठोंबरे,प्रा.विजयप्रकाश ठोंबरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख पृथ्वीराज पाटील, शिवसेना विधानसभा प्रमुख दादासाहेब ससाणे,तालुका सचिव विकास काशीद,महिला आघाडी तालुकाप्रमुख जयाताई राऊत,शहर प्रमुख वैशालीताई सांगळे,उपतालुकाप्रमुख महेंद्र चाटे,ज्येष्ठ नेते मालोजी नाना गलांडे पाटील,ज्येष्ठ नेते प्रकाश गुंड,ज्येष्ठ नेते डॉ.संतोष बुडूक,अभिजीत घाटूळ, संदीप नाईकवाडे,अशोक जोगदंड,बळीभाऊ चाटे, बलवंत सिंग गोके यांच्या सह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी,शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी केज तालुक्यातील विविध विकास कामांबाबत ना.श्री.संजय शिरसाट यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.तसेच तालुक्यातील प्रलंबित विकास कामांसंदर्भात निवेदन देण्यात आले आणि आजपर्यंत केलेल्या कार्याचा कार्य अहवालही सादर करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!