अपघातसामाजिक

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन, परिसरात शोककळा 

केज/प्रतिनिधी

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे गुरुवारी सकाळी लातूर- अंबाजोगाई महामार्गा वरील रेणापूर फाट्या जवळ झालेल्या भीषण कार अपघातात निधन झाले.राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, कारमध्ये ते एकटेच होते आणि गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटून पलटी झाल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज रेणापूर पोलिसांनी वर्तविला आहे. अपघाताची तीव्रता इतकी भिषण होती की यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेऊन त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे.

एका कार्यक्षम आणि तरुण अधिकाऱ्याच्या अशा अचानक जाण्याने महसूल प्रशासनासह संपूर्ण केज तालुक्यावर मोठी शोककळा पसरली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.तहसीलदार राकेश गिड्डे यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज, राष्ट्रीय पत्रकार संघ, पुरोगामी पत्रकार संघ व सह्याद्री पत्रकार संघ यांच्या वतीने उत्कृष्ट प्रशासकीय सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. प्रशासकीय सेवेत त्यांनी सर्वसामान्य जनतेची कामे सोडविण्यासाठी प्रयत्नशील होते.सर्व स्तरातील लोकांना ते सन्मानाची वागणूक देत असत.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!