अपघात

आष्टी तालुक्यातील कापसी फाट्यावर कार- टिप्परची धडक,माय- लेकराचा होरपळून दुर्दैवी मृत्यू

केज/प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील कापसी फाट्यावर आज एक अत्यंत भीषणआणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे.टिप्पर आणि कार यांच्यात झालेल्या समोरासमोर धडक इतकी भीषण होती की, कारमधील माय-लेकरा चा जागीच होरपळून मृत्यू झाला.आष्टीपंचायत समितीचे ग्रामसेवक तथा प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.श्रीहरी पुरी महाराज यांच्या पत्नी आणि मुलावर हा काळाने घाला घातला आहे.मिळालेल्या माहितीनुसार,केज तालुक्यातील साळेगाव येथील ह.भ.प.श्रीहरी पुरी महाराज यांची पत्नी पुष्पा श्रीहरी पुरी वय ४२ आणि मुलगा ऋषिकेश श्रीहरी पुरी वय २५ हे कारने आष्टीकडून बीड कडे जात होते.

कापसी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एका भरधाव टिप्परने कारला जोराची धडक दिली.धडक एवढी जोरात होती की,धडके नंतर कारने लगेच पेट घेतला,ज्यामध्ये माय- लेकराला बाहेरपडण्याची संधीच मिळाली नाही आणि त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला.दीड तासांच्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर अपघाताची भीषणता एवढी होती की,कारचा चेंदामेंदा झाला होता.घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ,पोलीस आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली.मृतदेह कारमध्ये अडकलेले असल्याने ते बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला तब्बल दीड ते दोन तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

श्रीहरी पुरी हे आष्टी पंचायत समितीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत असून ते एक उत्तम कीर्तनकार देखील आहेत.ज्यावेळी ही हृदयद्रावक घटना घडली, त्यावेळी पुरी महाराज एका कीर्तनाच्या कार्यक्रमात व्यस्त होते, अशी माहिती समोर आली आहे.या घटनेमुळे संपूर्ण आष्टी तालुक्यासह बीड जिल्ह्यात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!