क्रिडासांस्कृतीक

जिवाचीवाडी येथे रेणुकामाता यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचा फड रंगला भिकाराम सारूक, शिवाजी चौरे आदी नामांकित पहेलवान यांनी रंगवली झुंज

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही रेणुकामाता (माहुरची आई) यात्रेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.दिनांक ७ नोव्हेंबर,शुक्रवार रोजी आई रेणुकामातेच्या पालखीची मिरवणूक मोठ्या भक्तिभावाने व ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आली.पालखी मिरवणुकीस विविध सामाजिक,सांस्कृतिक संघटनांचा सहभाग होता. गावात रंगीबेरंगी सजावट, प्रकाश योजना आणि फटाक्यांची आतिषबाजी यामुळे वातावरण अधिकच मंगलमय झाले.

मिरवणुकीनंतर भक्तांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून लोकनाट्य व तमाशा मंडळाचे सादरीकरण करण्यात आले.या कार्यक्रमाला परिसरातील ग्रामस्थ व भाविकांची मोठी उपस्थिती लाभली.

दुसऱ्या दिवशी शनिवारी पारंपरिक जंगी कुस्त्यांचा रोमांचक सामना पार पडला.यामध्ये भिकाराम सारूक,शिवाजी चौरे यांच्यासह परिसरातील नामांकित पहेलवानांनी उत्कृष्ट झुंज देत उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. विजेत्या पहेलवानांचा सन्मानही आयोजक समितीच्या वतीने करण्यात आला.या यात्रे च्या माध्यमातून धार्मिक श्रद्धा,सांस्कृतिक वारसा आणि ग्रामीण क्रीडा परंपरेचा सुंदर संगम पाहायला मिळाला. यात्रेचे आयोजन ग्रामस्थांच्या पुढाकाराने यशस्वीरीत्या पार पडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!