क्रिडाशैक्षणिक

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेतील ऐश्वर्या घुले तसेच दिपाली पाटील या खेळाडूंची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

केज/प्रतिनिधी

जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर [ माध्यमिक विभाग ] केज या शाळेतील घुले ऐश्वर्या बप्पाजी तसेच पाटील दिपाली भीमाशंकर या खेळाडूंची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली.त्यांच्या या नेत्रदिपक यशाबद्दल जीवन विकास शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष अंकुशरावजी इंगळे, सचिव जी.बी.गदळे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलाताई इंगळे,शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे यांच्या उपस्थितीमध्ये यशस्वी खेळाडूंचा पालकासह सत्कार करण्यात आला.

दि.८ नोव्हेंबर २०२५ वार शनिवार रोजी के.के.एम. महाविद्यालय मानवत या ठिकाणी पार पडलेल्या विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या शाळेतील घुले ऐश्वर्या बप्पाजी या खेळाडूने १७ वर्ष वयोगटातून गोळा फेक, भालाफेक तसेच थाळीफेक या तिन्हीही क्रीडा प्रकारांमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला.तर पाटील दिपाली भीमाशंकर या खेळाडूने १७ वर्ष वयोगटातून गोळा फेक या क्रीडा प्रकारामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातून सर्व द्वितीय येण्याचा बहुमान मिळवला.वरील यशस्वी खेळाडूंना शाळेतील क्रीडा शिक्षक श्रीकिशन नेहरकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.

वरील प्रथम व द्वितीय आलेले खेळाडू दि.११ ते १४ नोव्हेंबर दरम्यान एस. व्ही.जे.सी.टी.क्रीडासंकुल डेरवन ता.चिपळूण जि. रत्नागिरी या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर विभागाचे नेतृत्व करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!