राजस्थानी सहकारी पतसंस्था परळी प्रकरणी शाखा व्यवस्थापक दिगंबर कागले यांना अटकपूर्व जामीन मंजूर

अंबाजोगाई/प्रतिनिधी
राजस्थानी सहकारी पतसंस्था,परळी येथील शाखा व्यवस्थापक दिगंबर रावसाहेब कागले यांना गु.र.नं.195/25 परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणूक व गैरव्यवहाराच्या गुन्ह्यात अटक होण्याची भीती असल्याने त्यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाला जिल्हा व सत्र न्यायालय, अंबाजोगाई यांनी मंजुरी दिली आहे.
दि.31ऑक्टोबर 2025 रोजी डॉ.रचना आर.तहेरा जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी हा आदेश दिला आहे.सदर गुन्हा भारतीय दंड विधान कलम 420, 406,409, 34 तसेच MPID कायदा कलम 3 आणि 4 अंतर्गत नोंद करण्यात आला आहे. न्यायालयाने काही अटी व शर्तींसह आरोपीस अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे.आरोपीच्या वतीने या प्रकरणात अॕडवोकेट डी.एम.काजगुंडे यांनी युक्तिवाद केला.त्यांना अॕड.अतूल डी.शेरेकर, अॕड.बी.आय.चौधरी, अॕड.अनिल राठोड,अॕड. इंगळे अक्षय यांचे सहकार्य लाभले.
सदर प्रकरणातील पुढील तपास परळी शहर पोलीस करत असून न्यायालयाच्या आदेशा नुसार आरोपीने तपासात सहकार्य करणे आवश्यक राहणार आहे.



