अंबासाखरचा २०२५ -२६ चा गळीत हंगाम आज सुरू होणार ; ह.भ.प. महंत भगवान महाराज शास्त्री वरपगावकर यांच्या हस्ते ऊस मोळी पूजन

केज/प्रतिनिधी
अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना अर्थात ‘अंबासाखर’च्या ऊस उत्पादक शेतकरी आणि हितचिंतकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारखान्याचा २०२५ -२०२६ या वर्षासाठीचा गळीत हंगामाचा शुभारंभ दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे.ह.भ.प.महंत
भगवान महाराज शास्त्री यांच्या शुभहस्ते ऊस मोळी पूजन करण्यात येणार असून यंदाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ एका मंगलमय वातावरणात पार पडणार आहे.कारखान्याच्या परंपरेनुसार,ऊस मोळीचे पूजन ह.भ.प.महंत भगवान महाराज शास्त्री वरपगावकर यांच्या शुभहस्ते केले जाणार आहे.यानंतरच प्रत्यक्ष गळीत हंगामाला सुरुवात होईल.प्रमुख उपस्थितीत
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर हे राहणार आहेत.या सोहळ्याला कारखान्याचे व्हाईस चेअरमन दत्ता आबा पाटील,राजेभाऊ औताडे यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहेत.
कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.डी.एस. मरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या प्रगती साठी आणि यंदाच्या हंगामाच्या यशासाठी या कार्यक्रमाला सर्व स्तरांतून मोठी उपस्थिती असणे अपेक्षित आहे.सर्वांना निमंत्रण दिले असून
या मंगलमय सोहळ्या साठी सर्व ऊस उत्पादक शेतकरी,कामगार बंधू आणि कारखान्याचे हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी,असे स्नेह निमंत्रण कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर यांच्याकडून देण्यात आले आहे.



