कृषी
कळंबअंबा येथील शेतकऱ्यांचे रायपर कंपनीचे किटकनाशक फवारणी केल्यामुळे सोयाबीन करपले
कंपनी कडून शेतकऱ्यांला नुकसान भरपाई द्यावी व तात्काळ पंचनामा करावा शेतकऱ्यांची मागणी

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील कळंबअंबा येथील मारोती तुकाराम ढवारे यांनी आडस येथुन पतंगे कृषी सेवा केंद्र येथून सोयाबीन फवारणीसाठी जयकिसान कंपनीचे रायपर हे किटकनाशक ची फवारणी केली असता सोयाबीन पिवळे होऊन करपले.त्यामुळे 25 एकर वरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे तरी शेतकरी मारोती तुकाराम ढवारे यांनी सदरील सोयाबीन पिकाची तक्रार तहसील कार्यालय,तलाठी कार्यालय,कृषी कार्यालय येथे केली आहे तरी पण कोणत्याही कार्यालयाचा सरकारी कर्मचारी पाहणी करण्यासाठी आला नाही तरी शासनाने तात्काळ अधिकारी पाठवुन पिकांचा पंचनामा करावा व जयकिसान कंपनीच्या रायपर कंपनी वर कार्यवाही करून कंपनी कडून शेतकऱ्यास नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.