सामाजिक

केज नगरपंचायतच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी जिल्हा नियोजन मधून ६ कोटी ३० लक्ष रुपयाचा निधी मंजूर,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ.हारुणभाई इनामदार व कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा डॉ.सौ.सिताताई बनसोड यांच्या प्रयत्नाला यश

केज/प्रतिनिधी

केज नगरपंचायतच्या माध्यमातून केज शहराचा चेहरा मोहरा बदलण्या साठी जिल्हा नियोजन अंतर्गत ६ कोटी ३० लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध कित्येक वर्षापासून केज शहर विकासापासून कोसो दूर होते परंतु गेल्या तीन-चार वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे जेष्ठ नेते डॉ.हारुणभाई इनामदार व कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड यांच्या अथक परिश्रमाने केज शहराचा चेहरा मोहरा बदलताना दिसत आहे.

यावेळी आम्ही पाहिलेले स्वप्न साकारताना दिसत असल्याचे ज्येष्ठ नेते डॉ. हारुणभाई इनामदार यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले.याच बरोबर केज शहरात विविध विकास कामे गेल्या तीन-चार वर्षात होत आहेत आणि काही कामे प्रगतीपथावर आहेत. यावेळी बोलताना पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर असतानाही आम्ही संकटाला तोंड देत केज वासियांना पाणीपुरवठा करत आहोत यात पाणी पुरवठ्याची योजना अंतिम टप्प्यात असून या कामासाठी १२९ कोटींची योजना तांत्रिक मान्यता पर्यंत मंजूरी साठी अंतिम टप्प्यात आहे.

काही दिवसात हे काम प्रत्यक्षात चालू होईल असे मत डॉ. हारुणभाई इनामदार यांनी बोलताना स्पष्ट केले.तर केज शहराच्या स्वच्छतेसाठी स्वच्छतागृह बांधण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यामुळे स्वच्छ शहर सुंदर शहर या माध्यमातून झाल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच आमदार नमिताताई मुंदडा, खासदार रजनीताई पाटील,रमेशरावजी आडसकर यांच्या प्रयत्नामुळे केज शहराला निधी उपलब्ध झाला असे मत व्यक्त करून महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आम्हाला जिल्हा नियोजनामधुन निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल दादांचे आभार व्यक्त केले.

केज शहरातील विकास कामे ही दलित वस्ती सुधारण्या सह मूलभूत कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून शहरात ज्या भागांमध्ये दलित वस्ती आहे अथवा दलित नागरिक हे ज्या भागात राहतात.या निधीमुळे शहराच्या विकासाला एक नवी दिशा मिळाली. मागील तीन ते चार वर्षापासून ज्येष्ठ नेते डॉ. हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड यांच्या प्रयत्नातून केज शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात आला असून जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या नगरपरिषद प्रशासन विभागाने एकाच दिवशी तीन प्रमुख योजने तील कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.

सहा कोटी तीस लक्ष रुपयाचा निधी दिल्यामुळे केज शहराच्या विकासासाठी भर पडली असून या मंजूर निधीमध्ये महाराष्ट्र नगरोत्थान महाअभीयान जिल्हास्तरीय,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरिक दलितवस्ती सुधार योजना आणि नागरी दलिततेत्तर वस्ती सुधार योजना या महत्त्वाच्या तीनयोजनांचा समावेश आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलितवस्ती सुधार योजना व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांची लोकसंख्या असलेल्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे व शहरातल्या अन्य भागात मूलभूत सुविधा साठी निधीचा वापर करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर शहरातील अनेक ठिकाणचे नाल्या, रस्ते,पिण्याच्या पाण्या साठी पाईपलाईन, स्वच्छता, शहरातील काही मुख्य रस्ते तर काही जोड रस्त्यांचे कामे पूर्ण झालेले आहेत तर उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत व उर्वरित कामे मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत लवकरच केज शहराच्या विकासा साठी आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्यांनी शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करणार आहोत असे नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!