लक्ष्मण बेडसकर चा अटकपूर्व जामीन केज न्यायालयाने फेटाळला

केज/प्रतिनिधी
केजचे तत्कालीन गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांचा अटक पूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. विनयभंगाच्या अनेक प्रकरणांमध्ये सहजपणे मॅनेजमेंट करून निसटलेला लक्ष्मण बेडसकर वर शेवटी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला. परंतु जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला आहे. हा बेडसकरासाठी मोठा धक्का मानला जात असून केज येथील अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून केजचे तत्कालीन बीईओ लक्ष्मण बेडसकर याच्या वर पोक्सो अंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोक्सो हा गुन्हा अत्यंत गंभीर असून यामध्ये आरोपीला अटकपूर्व जामीन मिळू शकत नाही ,अनेक मजबूर महिलांचा फायदा घेत, हजार आणि पाचशे ची भाषा करत नैतिकतेचे उल्लंघन करणाऱ्या लक्ष्मण बेडसकरला अखेर न्यायालयानेही दणका दिला.असे असतानाही या गुन्ह्यातून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी लक्ष्मण बेडसकर यांचा केविलवाणा प्रयत्न केज येथील सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.केजयेथील जिल्हा व सत्र न्यायालयांच्या वकिलामार्फत न्यायालयामध्ये धाव घेण्यात आलेली होती.
याबाबत न्यायालया मध्ये सुनावणी झाली असता लक्ष्मण बेडसकर यांचा जामीन अर्ज फेटाळूनलावण्यात आलेला आहे.दरम्यान या गुन्ह्यानंतर बेडसकरांच्या अनेक ऑडिओ क्लिपही वायरल झालेल्या आहेत.या वायरल झालेल्या क्लिपमधून शिक्षण विभागातील अनेक अधिकाऱ्यांची खऱ्या अर्थाने पोलखोल होत असल्याचे बोलले जात आहे.



