
केज/प्रतिनिधी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक, शिक्षकेत्तरकर्मचारी तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यां साठी तसेच पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. असून एकूण ४२ स्पर्धे पैकी ०८ स्पर्धा दि.७ नोव्हेंबर रोजी साने गुरुजी निवासी विद्यालय केजच्या मैदाना वर या विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन गट शिक्षणाधिकारी सुनिल केंद्रे यांच्या हस्ते झाले .या वेळी शिक्षकांना त्यांनी मार्गदर्शन करताना शिक्षकांना या माध्यमातून ही एक स्पर्धा नसुन शिक्षण क्षेत्रातील सर्वांसाठी एक संधी आहे यातुन त्यांना एन.ई.पी. २०२० च्या तत्वांना मुर्त स्वरूप देतील. शिक्षकांचे व्यावसायिक सक्षमीकरण होण्यास मदत होईल.
शिक्षकांना नवीनअध्यापन पद्धती,तंत्रज्ञानाचा वापर आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास करण्यास प्रोत्साहन मिळेल असे मत व्यक्त केले.यावेळी तालुक्यातील सहभागी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या स्पर्धेचे पंच म्हणून नागरगोजे त्र्यंबक,शेप अरुण,विनोद गुंड,दिपक साखरे,घुले दत्तात्रय यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. कविताताई कराड मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन दिपालीताई कांदे यांनी मानले.



