सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपातून आरोपीची सुटका,केज जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल

केज/प्रतिनिधी
सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात केल्याचा निर्णय केज जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला आहे.ही सुनावणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती आर.के.शेख यांच्या न्यायालयात झाली. प्रकरण क्रमांक S.C.No.31/2024 अंतर्गत आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी पक्षाने दिलेल्या पुराव्यावर बचाव पक्षाचे वकील अॅड.डी. एम.काजगुंडे यांनी केलेला प्रभावी उलट तपास व युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरत आरोपी निर्दोष ठरविला.
याप्रकरणात अॅड.बी. आय.चौधरी,अॅड.अक्षय इंगळे व अॅड.अनिल राठोड यांनी सहकार्य केले.या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, फिर्यादी संगिता दिनकर कांबळे वय 45 रा.धारूर व्यवसाय बस वाहक, धारूर आगार यांनी पोलीस स्टेशन धारूर येथे दिलेल्या तक्रारीनुसार,दि. 26 ऑगस्ट 2023 रोजी अंबाजोगाई बसस्थानका वरून परतताना एका प्रवासी महिलेने तिच्याशी वाद घालत मारहाण केली व शिवीगाळ केली होती. या घटनेनंतर आरोपीवर कलम 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.सर्व पुरावे व दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी विरुद्ध पुरेसा पुरावा नसल्याचे नमूद करत निर्दोष मुक्तता केली आहे.



