वर्ग मैत्रिणीला मेसेज केला,लोखंडी रॉडने मारहाण चौघांविरुद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा नोंद

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील एका खेडेगावात महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या वर्ग मैत्रिणीच्या मोबाईल वर मेसेज केल्याच्या कारणावरून गावातीलच 17 वर्षीय युवकास दुचाकीवर बसवून शेतात नेऊन त्याला जातीवाचक शिवीगाळ करून चापटा, बुक्क्याने व लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्या प्रकरणी चौघांविरुद्ध केज पोलिसात अॕट्रॉसिटीचा गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील एका खेडेगावातील 17 वर्षीय तरुण आपल्या गावा जवळच असलेल्या एका कनिष्ठ महाविद्यालयात 11 विच्या वर्गात शिक्षण घेत आहे.त्याच कनिष्ठ महाविद्यालयात 11 वी च्या वर्गातच शिक्षण घेणाऱ्या वर्ग मैत्रिणीच्या मोबाईलवर या युवकांने मेसेज पाठविल्याचा राग मनात धरून सोमवारी दि. 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सचिन अभिमान मोरे व गणेश तुळशीराम मोरे या दोघांनी या तरुणाला दुचाकीवर बसवून शेतात नेले.त्याठिकाणी या दोघांसह त्यांचे वडील अभिमान मोरे व तुळशीराम मोरे अशा चौघांनी संगनमत करून तु मुलीला मेसेज का केलास? म्हणुन त्याला माफी मागायला लावली.त्याचे व्हीडिओ शूटिंग केले.
त्यानंतर त्याला जाती वाचक शिवीगाळ करून चप्पल,चापटा, बुक्क्याने व लोखंडी रॉडने त्याला मारहाण करून जखमी केले.अशी तक्रार उमेश कोकाटे याने दिल्यावरून सचिन मोरे, गणेश मोरे,अभिमान मोरे, तुळशीराम मोरे रा. एकूरका या चौघांविरुद्ध अॕट्रॉसिटीचा गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम हे करीत आहेत.



