केज-कानडी रोडवर भीषण अपघात, कोल्हेवाडी येथील २० वर्षीय तरुण गंभीर जखमी,पत्रकार नंदुलाल मिसाळ यांनी जखमीला दवाखान्यात केले रवाना

केज/प्रतिनिधी

दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११-३० वाजण्याच्या दरम्यान केज-कानडी माळी रोडवर शांताबाई तापडिया इंग्लिश स्कूल पासून एक किलोमीटर अंतरावर कानडीमाळी कडे जाणाऱ्या रस्त्यावर महेश सुभाष लुकडे,वय अंदाजे २० वर्षे, रा. कोल्हेवाडी या तरुणाचा भरधाव वेगाने दुचाकी रॉयल एनफिल्ड एम.एच. ४४ ए.बी.८६४७ या गाडीचा घसरून अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीनुसार समोर आले आहे.
सदरील तरुण अपघाताच्या ठिकाणी बराच वेळ पडून तडफडत होता.त्याचा चेहरा रक्त बंबाळ झाल्यामुळे त्याला ओळखणे अवघड जात होते.शेवटी त्याच्या काही गावकऱ्यांच्या मदतीने, त्याला केज येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. सदरील अपघाताची माहिती मिळताच कोल्हेवाडीचे सरपंच नंदकुमार मिसाळ देखील त्या ठिकाणी पोहोचले.
त्याला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान कानडी रोडचे यश कन्स्ट्रक्शन कंपनीने काम अर्धवट ठेवल्याने तसेच पंखे न भरल्यामुळे अपघात होत आहेत परंतु प्रशासन याविषयी युग गिळुन गप्प बसलेले आहे. वारंवार आंदोलने करुन सुद्धा यश कन्स्ट्रक्शन ला मोकळीक दिली जात आहे.

