प्रभाकर कुलकर्णी सारणीकर यांचा अमृत महोत्सव 75 वा वाढदिवस साजरा आपल्या गावी करणार

केज/ प्रतिनिधी
केज तालुक्यातील सारणी सांगवी या गावातील प्रभाकर जनार्दन कुलकर्णी यांच्या 75 वाढदिवसाच्या निमित्ताने सारणी या गावी कीर्तन भजन जागरण तुला व गाव जेवण असा भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे या कार्यक्रमानिमित्त सर्व आप्तसोकीय व मित्रपरिवार उपस्थित राहणार आहे .
केज तालुक्यातील सारणी सांगवी या गावचे मूळ रहिवासी प्रभाकर जनार्दन कुलकर्णी यांचा अमृत महोत्सव 75 वा वाढदिवसाच्या निमित्ताने शनिवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी ह भ प जगन्नाथ महाराज जोशी रामगड गाव यांचे प्रवचन सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ भजनी मंडळ सारणी सांगवी सायंकाळी सहा ते सात ह भ प लक्ष्मण महाराज चव्हाण सोलापूर यांचे कीर्तन रात्री आठ ते दहा तर रविवार दिनांक 9/ 11 /2025 रोजी गावातल्या देवतांना अभिषेक सकाळी नऊ ते दहा होम हवन सकाळी दहा ते बारा तुला दुपारी बारा ते एक आणि भोजन दुपारी दोन ते सात पर्यंत असा भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे.
प्रभाकर कुलकर्णी यांचे बालपण अतिशय कष्टात गेलेले असून त्यांनी सोलापूर येथील किर्लोस्कर कंपनी येथे कामगार म्हणून काम केले विठ्ठलावर भक्ती आणि भानुदास सद्गुरु भानुदास महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सर्व काही चांगले झाले असल्यामुळे सोलापूरहून पुण्याला स्थायिक झाले मुलांचे वगैरे सगळे चांगले झाल्यानंतर अमृत महोत्सव निमित्त 75 वा वाढदिवस गावाकडे साजरा करावा तसेच आपल्या पत्नीचा 71 वा वाढदिवस देखील साजरा करावा या हेतूने गावातील आपला मित्र परिवार तसेच आप्तसोकीय व गावातील सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे यासाठी त्यांनी आवाहन केले.
आपली गावाकडली नाळ कधीही तुटू दिली नाही नियमित पणे दरवर्षी हनुमंत पिंपरी येथील यात्रेला येत राहिले सर्व भावाची लग्ने बहिणीचे लग्न त्यांनीच करून दिले व तेही गावीच. अतिशय कठीण काळातही आपली वडिलोपार्जित जमीन जोपासली आणि कष्ट करून पाच भाऊ व तीन बहिणी आई या सर्वचे सर्व व्यवस्थित करून दिले.
आयुष्य हे संपूर्ण कष्टात जाऊन देखील आपला अमृत महोत्सव वाढदिवस आपल्या गावीच करायचा असे ठरवून गावातील सर्व मित्र परिवार नातेवाईक मूल जावई नातवंड यांच्या सोबत करून सगळ्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न करायचा आपले गाव हे आपले गाव असते हिच यामागची भावना



