
केज/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे सहकार व कृषी पणन मंत्री ना.श्री. बाबासाहेब पाटील यांच्या धावत्या प्रवासा दरम्यान केज येथे त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. या दौऱ्यात सहकार विभागातील विविध अधिकाऱ्यांनी आणि सहकारी संस्था प्रतिनिधींनी सहकार क्षेत्रातील समस्यांबाबत प्रत्यक्ष चर्चा साधली.
यावेळी सहाय्यकनिबंधक सहकारी संस्था केज येथील अधिकारी श्री.एस. डी.नेहरकर,मुख्य लिपिक श्रीमती एम.एस.वहावळे व त्यांचे यजमान श्री. अनिल डोंगरे, खोडसे सी.ए.प्रमाणित लेखा परीक्षक सहकारी संस्था, बीड तसेच संतोष लोंढे, गट सचिव सेवा सहकारी संस्था केज यांच्या उपस्थितीत सहकार मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी केज तालुक्यातील सहकारी संस्थांची सद्यस्थिती, त्यांची प्रगती आणि भेडसावणाऱ्या अडचणी यावर सविस्तर चर्चा झाली.
श्रीमती वहावळे यांनी सहकारी संस्थांच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना व सरकारी स्तरावरील मदतीची अपेक्षा याबाबत मंत्र्यांना सविस्तर माहिती दिली. तसेच खोडसे सी.ए.लेखा परीक्षक संस्था यांनी प्रातिनिधिक स्वरूपात लेखापरीक्षकांच्या फी वाढीचा मुद्दा,लेखा परीक्षक पॅनलची मुदत पाच वर्षांपर्यंत करण्याची मागणी केली तसेच या दोन्ही महत्त्वाच्या प्रश्नांवर महाराष्ट्र ऑडिटरकौन्सिल असोसिएशनच्या वतीने सविस्तर मांडणी केली.
ना.श्री.बाबासाहेब पाटील यांनी सादर झालेल्या सर्व मागण्यांचे गांभीर्याने परीक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.या वेळी मा.मंत्री महोदय व उपस्थित मान्यवर यांचे लेखा परीक्षक श्री.सी.ए. खोडसे यांनी आभार व्यक्त केले.



