केज येथे सहाय्यक निबंधक पदी श्री.एस.डी. नेहरकर यांची नियुक्ती, पत्रकार संघ व लेखा परीक्षक संघातर्फे सत्कार

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यात सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या पदावर श्री.एस.डी. नेहरकर यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. शांत,संयमी,अभ्यासू, कायदे तज्ञ व कर्तव्यदक्ष अशा व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जाणारे श्री. एस.डी. नेहरकर हे impossible या शब्दा कडेही I am possible या सकारात्मक नजरेने पाहणारे अधिकारी म्हणून प्रसिध्द आहेत.
या निमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई शाखा केज यांच्या वतीने श्री. चंद्रकांत पाटील तसेच प्रमाणित लेखापरीक्षक सहकारी संस्था,बीड यांच्या वतीने श्री.खोडसे सी.ए.,श्री.विठ्ठल मुुळे व अभिषेक ताकतोडे यांच्या उपस्थितीत श्री.एस.डी. नेहरकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी केज तालुक्यातील विविध सहकार संस्था, पतसंस्था व अन्य सहकारी संस्थांच्या सध्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
भविष्यात सहकार संस्था प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन श्री.एस. डी.नेहरकर यांनी या वेळी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमाणित लेखापरीक्षक सहकारी संस्था,बीड यांच्या वतीने श्री.खोडसे सी.ए.यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आहेत.



