केज अतिरिक्त सत्र न्यायालय इमारतीच्या दुसऱ्या मजल्याला मंजुरी, पावणे आठ कोटींचानिधी मंजूर,आ.नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश

केज/प्रतिनिधी
वाढत्या न्यायालयीन कामकाजामुळे जागेची कमतरता भासत असलेल्या केज येथील अतिरिक्त सत्र न्यायालया च्या इमारतीवर दुसरा मजला बांधण्यास शासनाने अखेर मंजुरी दिली आहे.आ. नमिता मुंदडा यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून रु. ७ कोटी ७६ लाख ५० हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
विधी व न्याय विभागाच्या दि.६ ऑक्टोबर रोजी जारी आदेशानुसार, हे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली करण्यात येणार आहे.आ.मुंदडा यांनी न्यायालयाच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन शासन दरबारी वारंवार ही मागणीमांडली होती. या मंजुरीमुळे केज तालुक्यातील न्याय व्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा विकास होणार असून,नागरिकांसाठी अधिक सुटसुटीत आणि सुविधा-संपन्न व्यवस्था उपलब्ध होणार आहे.
या कामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे आमदार नमिता मुंदडा यांनी आभारमानले आहेत.



