न्यायसामाजिक

डॉ.संपदा मुंडे हत्या प्रकरणी मा.उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करून सखोल चौकशी करावी – वसंत मुंडे       

बीड/प्रतिनिधी

डॉ.संपदा मुंडे यांच्या हत्या प्रकरणी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात खळबळ माजली असून यास राजकीय नेते व प्रशासन जबाबदार असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला.प्रशासना मार्फत वेगवेगळ्या समित्या चौकशी करिता नेमल्या जातात पण त्यात राजकीय व प्रशासकीय हस्तक्षेप असल्यामुळे त्यांच्या कडून निपक्ष:पणे संबंधित घटनेच्या मुद्दे निहाय चौकशी केली जात नाही.

स्वतःमुख्यमंत्री फलटनला जाऊन भाजप च्या राजकीय नेत्यांना चौकशी न करता अभय भाषणात देतात.डॉ.संपदा मुंडे ह्या गरीब शेतकरी कुटुंबातल्या असून मौजे कवडगाव तालुका वडवणी जिल्हा बीड येथील रोजंदारी करणारे कुटुंब आहे.त्या कुटुंबावर खूप मोठ्या प्रमाणात संकट कोसळले असून यामध्ये जबाबदारी राजकीय नेते व प्रशासकीय यंत्रणेमार्फत दबावापोटी हॉटेल मधुदिप मध्ये आत्महत्या केली नसून हत्या करण्यात आली आहे.

या हत्येस जबाबदार भाजप चे माजी खा.रणजीत सिंह नाईक निंबाळकर त्यांचे दोन पी ए,पीएसआय गोपाळ बदने घरमालक बनकर तसेच हॉटेलमध्ये संचालक दिलीप सिंह भोसले व त्यांचे कर्मचारी यांची संपूर्ण मुद्देनिहाय चौकशी करण्यात यावी व त्यांचे मोबाईल जप्त करून कॉल रेकॉर्डिंग तपासावेत अशी मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली. दवाखान्यात सेवेसाठी रात्री बेरात्री शवविच्छेदना साठी डॉक्टर संपदा मुंडे यांना बोलावून घेऊन महिला असूनही त्रास दिला जात होता.

भाऊबीजच्या दिवशी दिवाळी असतानाही २३ सप्टेंबर २०२६ ला तळहातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली नसून हत्या करण्यात आली आहे ,यास सर्वस्वी राजकीय नेते व प्रशासन जबाबदार असून मेडिकल रिपोर्ट फिट प्रमाणपत्र बदलून देण्यासाठी मोठे शडयंत्र रचून लैंगिक शारीरिक छळ,मानसिक त्रास दिलेल्या असल्या मुळे मा.उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा मार्फत संपूर्ण प्रकरणाची निपक्षपद्धतीने तपासणी मुद्दे निहाय करून कायदेशीर गुन्हेगारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी शासनाकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!