केज तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी वेगात,शिवसेना कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम – जिल्हाप्रमुख सचिन भैय्या मुळूक

केज/प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या रणनीतीबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख सचिन भैय्या मुळूक यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.सचिनभैय्या मुळूक यांनी यावेळी बोलताना सांगितले की,येत्या निवडणुकीत शिवसेना पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या पाठीमागे आम्ही संपूर्ण ताकतीने उभे राहू.केज तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे आणि हा विश्वास जपण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम करणार आहोत,” असे ठाम मत व्यक्त केले.
केज तालुक्यातील ७ जिल्हा परिषद आणि १४ पंचायत समिती मतदार संघांसाठी इच्छुक उमेदवारांची यादी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी वरिष्ठ नेत्यांकडे पाठविल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.या चर्चेसाठी पृथ्वीराज पाटील शिवसेना तालुकाप्रमुख, केज,दादासाहेब ससाणे शिवसेना विधानसभा प्रमुख,दत्तकुमार काकडे युवासेना तालुकाप्रमुख, केज,महेंद्र चाटे शिवसेना उपतालुकाप्रमुख,केज यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.



