किल्लेधारूर येथील आदर्श उद्योजक माधव तात्या निर्मळ यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश

केज/प्रतिनिधी
माजलगाव विधानसभा मतदारसंघातील आदर्श उद्योजक व लोकप्रिय युवा नेते माधव तात्या निर्मळ यांनी दि.२६ ऑक्टोबर रोजी रविवारी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.परळी येथे झालेल्या भव्य स्नेह मिलन कार्यक्रमात पर्यावरण मंत्री तथा भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते निर्मळ यांचा पक्षात औपचारिक प्रवेश झाला.
या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर भाऊ देशमुख, जिल्हा सचिव सुनील आबा गलांडे,जेष्ठ नेते रामकृष्ण (काका) घुले,जनार्धन गालफाडे,लोमटे काका, सुरज भैया घुले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत माधव तात्या निर्मळ यांच्या प्रवेशाचे स्वागत केले.
माधव तात्या निर्मळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मा. पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वावर आणि विकासा भिमुख कार्यशैलीवर माझा पूर्ण विश्वास आहे. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन विकासाचे कार्य पुढे नेण्यासाठी मी भाजपा मध्ये आलो आहे.
जनतेचा विश्वास संपादन करून माजलगाव मतदार संघात भाजपा मजबूत करणे हेच माझे ध्येय आहे. यावेळी पंकजाताई मुंडे यांनीही त्यांच्या स्वागतपर भाषणात म्हटले की,माधव तात्या निर्मळ हे समाजसेवा आणि उद्योजकतेतून लोकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत.अशा उद्यमशील तरुणांच्या सहभागामुळे पक्ष अधिक बळकट होईल.
या कार्यक्रमाला बीड,केज, अंबाजोगाई परळी,आष्टी, पाटोदा,माजलगाव,वडवणी, धारुर आणि आसपासच्या भागातील असंख्य भाजपा कार्यकर्ते,नागरिक आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी माधव तात्या निर्मळ यांना कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून आणि जयघोष करत अभिनंदन केले.
माधव तात्या निर्मळ यांच्या प्रवेशामुळे माजलगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाला नवे बळ प्राप्त होणार असल्याचे राजकीय वर्तुळात सांगितले जात आहे. दरम्यान माधव तात्या निर्मळ यांच्या रूपाने नवीन ओबीसी चेहरा भाजपला मिळाला आहे.



