केज तालुका काँग्रेसच्या अल्पसंख्याक अध्यक्षपदी ॲड.अजमेर शेख यांची निवड,खा.रजनीताई पाटील यांनी केले स्वागत

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील होळ येथील ॲड.अजमेर सादेक शेख यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या केज तालुका अल्पसंख्याक अध्यक्षपदी शनिवारी दि.२५ऑक्टोबर रोजी निवड करण्यात आली आहे.ही निवड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या तथा खा.रजनीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी माजी मंत्री अशोकराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आदित्य दादा पाटील,बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष असिफोद्दीन खतीब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण बापु शेप, बाळासाहेब ठोंबरे,प्रताप मोरे सर,विश्वजीत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.दरम्यान, ॲड.अजमेर शेख यांचे उच्चशिक्षण दिल्ली येथे झालेले असून कायद्याचे शिक्षणही घेतलेले आहे.
होळ येथे त्यांनी गेल्या १० वर्षांपासून स्वतःचे मोफत ग्रंथालय व कोचिंग क्लासेस चालवित आहेत. तसेच, सातत्याने समाज माध्यमातून अल्प संख्याकांच्या प्रश्नावर आवाज उठवत असतात. आता त्यांनी राजकारणात सक्रीय होण्याचा निर्णय घेतला असून काँग्रेस पक्षातून राजकीयकार्याला सुरुवात केली आहे. मान्यवरांनी ॲड.अजमेर शेख यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



