जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसेनेची रणनीती बैठक संपन्न

मुंबई/प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची एक महत्त्वपूर्ण रणनीती बैठक मुंबई येथे संपन्न झाली.दिनांक १५ ऑक्टोबर २०२५, वार गुरुवार रोजी ही बैठक घेण्यात आली.या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याबाबत तसेच ग्रामीण मतदार संघात शिवसेनेचा प्रभाव वाढविण्यासाठी विविध रणनीतींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीला शिवसेनेचे नेते व खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना नेते रामदास कदम,शिवसेना सचिव संजयजी मोरे,शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी तसेच मराठवाडा संपर्क प्रमुख, माजीमंत्री अर्जुन खोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकी दरम्यान आगामी निवडणुकांचे नियोजन, स्थानिक संघटनांचे बळकटीकरण,युवा नेतृत्वाचा सहभाग,तसेच प्रभागनिहाय प्रचार मोहीमेचे नियोजन अशा विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. जिल्हापातळी वरील पदाधिकाऱ्यांनी आपले मत मांडत निवडणूक विजयासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीस जिल्हाप्रमुख सचिन भैय्या मुळूक, जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप जिल्हाप्रमुख स्वप्निल भैया गलधर,शिवसेना विधानसभा प्रमुख केज दादासाहेब ससाणे, शिवसेना तालुकाप्रमुख केज पृथ्वीराज पाटील, तालुकाप्रमुख अंबाजोगाई अर्जुनराव वाघमारे,युवा सेना तालुकाप्रमुख केज दत्तकुमार काकडे तसेच विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व मतदार संघांमध्ये प्रभावी संघटन उभारणीसाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा प्रत्येक मतदारसंघात फडकविण्याचा आत्मविश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे शिवसेनेची निवडणुकी साठीची रणनीती अधिक भक्कम झाली असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.



