काॕग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राहूल भैय्या सोनवणे जिल्हा परिषद निवडणूक लढवणार

केज/प्रतिनिधी
चंद्रकांत पाटील
खा.सौ.रजनीताई पाटील व मा.मंत्री अशोक दादा पाटील यांच्या नेतृत्वात घडलेले,तरुण,तडफदार आणि लोकहितवादी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे राहूल भैय्या सोनवणे हे येणाऱ्या जिल्हापरिषद निवडणुकी च्या मैदानात उतरणार असून,त्यांच्या उमेदवारी ची चर्चा सध्या संपूर्ण युसुफवडगाव जिल्हा परिषद गणामध्ये जोरदार रंगली आहे.
राहूल भैय्या सोनवणे हे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष असून,शैक्षणिक,कृषी आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेला मोलाचा सहभाग सर्वदूर प्रसिद्ध आहे.केवळ राजकीय व्यक्तीच नव्हे,तर एक प्रगत शेतकरी,समाज सेवक आणि जनतेचा आधारस्तंभ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.केज तालुक्यातील
सारणी आनंदगाव येथील रहिवासी असलेले राहुल भैय्या सोनवणे यांनी आपल्या गावाच्या विकासासाठी अनेक स्वखर्चाने कामे केली आहेत.रस्ते,पाणीपुरवठा, मंदिर दुरुस्ती,विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत,तसेच गरीबांच्या विवाहकार्याला आर्थिक सहाय्य अशा विविध सामाजिक उपक्रमामुळे त्यांनी जनतेच्या मनात आपला ठसा उमटवला आहे.
गंगा माऊली साखर कारखान्याचे संचालक म्हणून कार्य करताना त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जवळून समजून घेतल्या.उसाला योग्य भाव आणि वेळेवर बिले देण्याच्या कारखान्याच्या निर्णयांमुळे शेतकऱ्यांचा त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. परिणामी, आज शेतकरी बांधवांचा ठाम पाठिंबा सोनवणे यांना मिळत आहे.युसुफवडगाव सर्कलमधील जनता त्यांना “गोरगरीबांचा कैवारी” म्हणून ओळखते.
कोणतीही अडचण असो, रात्रीचा कोणताही वेळ असो मदतीसाठी धावून जाणारे राहूल भैय्या हे हसतमुख, दिलदार आणि जनतेसाठी तत्पर व्यक्तिमत्व म्हणून सर्वांच्या हृदयात घर करून बसलेले आहेत. सामाजिक आणि लोक कल्याणाच्या दृष्टीने ते सदैव सक्रिय राहतात. दवाखान्यातील रुग्णांना मदत, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा,तसेच ग्रामविकासाच्या योजना राबविण्याचे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
आज संपूर्ण युसुफवडगाव जिल्हा परिषद गणामध्ये राहूल भैय्या सोनवणे यांच्या नावाची जिल्हा परिषदेच्या संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा सुरू आहे.जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद,गावागावांतून मिळणारा पाठिंबा आणि त्यांच्या कार्यामुळे यावेळी राहुल भैय्या सोनवणे यांचा विजय निश्चित मानला जात असल्याची चर्चा जनतेतून होत आहे.
जनतेच्या हितासाठी अहोरात्र झटणारे,निस्वार्थ सेवाभावी नेतृत्व म्हणजे राहूल भैय्या सोनवणे. समाजकार्याची आवड, जनतेशी असलेली आत्मीयता आणि विकासाचे ध्येय यामुळेच ते केज तालुक्यातील तरुण नेतृत्वाचे प्रेरणा स्थान ठरले आहेत. जनतेचा विश्वास, शेतकऱ्यांचा आधार आणि समाजसेवेची ओढ याच बळावर राहूल भैय्या सोनवणे यांचा विजय निश्चित आहे असा आत्मविश्वास कार्यकर्त्यां कडुन व्यक्त होत आहे.



