राज्यसभेच्या खासदार सौ.रजनीताई पाटील यांचा बीड जिल्ह्याचा दौरा २७ ऑक्टोबरला

केज/प्रतिनिधी
राज्यसभेच्या खासदार तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ नेत्या सौ.रजनीताई पाटील या दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सोमवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, विविध ठिकाणी विकासकामांची पाहणी,बैठका व कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे.
खासदार सौ.रजनीताई पाटील यांचा दौरा सकाळी ९ वाजता शिवनेरी निवासस्थान, केज येथून कवडगाव ता. वडवणी येथे जाण्यापासून सुरू होईल.
स्व.डाॕ.संपदा मुंडे यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेऊन तेथून त्या बीड कडे प्रयाण करतील व सकाळी ११:३० वाजता बीड येथे आगमन होईल.त्यानंतर दुपारी १२ वाजता महिला महाविद्यालय बीड येथे स्थानिक स्वराज्य संस्था व मराठवाडा पदवीधर नोंदणी संदर्भात मा.मंत्री अनिस अहमद यांच्या उपस्थितीत बैठकीत सहभागी होणार आहेत.
दुपारी १ ते ३ या राखीव वेळेत त्या विविध कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.दुपारी ३ वाजता बीड येथून छत्रपती संभाजीनगर विमान तळाकडे प्रयाण करणार असून,सायंकाळी ५-३० वाजता त्या विमानाने दिल्लीकडे रवाना होतील.या दौऱ्यात बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनवणे व स्विय सहाय्यक प्रताप मोरे हे त्यांच्या सोबत असतील.
खासदार पाटील यांच्या दौऱ्यामुळे बीड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विविध ठिकाणी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. स्थानिक प्रशासनाने त्यांच्या दौऱ्याची सर्व माहिती जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयाला कळविण्यात आली आहे असे स्विय सहाय्यक प्रताप मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.



