सामाजिक
औरंगपुर येथील श्रीक्षेत्र पावनधाम येथे राष्ट्रवादीचे नेते रमेशरावजी आडसकर यांची सदिच्छा भेट

केज/प्रतिनिधी
सन २०२५ च्या कार्तिक वारी दिंडी सोहळ्याबद्दल, ‘पावनधाम ते पंढरपूर’ या दिंडीतील भाविक भक्ता साठी दि.२५ ऑक्टोबर २०२५ रोजी अन्नदान राष्ट्रवादी काॕँग्रेसचे युवक केज तालुकाध्यक्ष शिवदास थळकरी यांनी दिंडीतील भाविक भक्ता साठी अन्नदान ठेवले होते.
कार्तिक वारी दिंडी सोहळ्याबद्दल पावनधाम येथे अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते रमेशरावजी आडसकर यांनी सदिच्छा भेट दिली तसेच महंत श्री.ह.भ.प. महादेव महाराज बोराडे शास्त्री यांचा सत्कार केला.यावेळी उपस्थित राष्ट्रवादी कांग्रेसचे युवक केज तालुकाध्यक्ष शिवदास थळकरी,किरण सातपुते,अॕड.बाळासाहेब इंगळे आदी भाविक भक्त उपस्थित होते.



