निवडणूकराजकीय

बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकां मध्ये समविचारी पक्ष संघटनेचा सक्षम पर्याय देण्यासाठी लवकरच बैठक – भाई मोहन गुंड

बीड/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यासह राज्या तील कार्यकाळ संपलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपरिषद व नगर पंचायतींच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत.

या पार्श्वभूमीवर भांडवलदार आणि प्रस्थापित पक्षांविषयी सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास उरलेला नाही अशा भावना व्यक्त करत शेतकरी कामगार पक्षाचे नेते व राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई मोहन गुंड यांनी बीडजिल्ह्यातील समविचारी पक्ष संघटनांच्या प्रमुखांसमवेत बैठक घेऊन जिल्ह्यात एक सक्षम पर्याय उभा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.भाई मोहन गुंड यावेळी म्हणाले की, भांडवलदार व प्रस्थापित पक्ष केवळ स्वतःच्या संस्था,कारखाने आणि राजकीय अस्तित्व टिकविण्यापुरतेच कार्य करतात.त्यांनी आजपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्ते व तरुणांचा कधीही विचार केलेला नाही.

त्यामुळे या वेळी जिल्ह्यातील तरुणांना पुढे आणण्या साठी आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज होण्यासाठी समविचारी पक्ष आणि संघटनांना एकत्र करून जिल्ह्यात नवा राजकीय पर्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.ते पुढे म्हणाले की,जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपरिषद व नगर पंचायतींच्या सर्व जागा लढविण्याच्या दृष्टीने लवकरच समविचारी पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांची महत्वपूर्ण बैठक आयोजित केली जाणार आहे.

या बैठकीत सर्वांनुमते पुढील रणनीती ठरवून जिल्ह्यात शेतकरी, कामगार,श्रमजीवी वर्ग आणि सर्वसामान्य जनतेचा राजकीय आवाज बळकट करण्याचा संकल्प केला जाईल.बीड जिल्ह्यात शांतसंयमी आणि विचार प्रधान राजकारणाचापाया मजबूत करण्यासाठी ही आघाडी सक्षम पर्याय ठरणार असल्याचे भाई मोहन गुंड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

 कुठल्या ही प्रस्थापित पक्षावर सामान्याचा विश्वास राहीला नाही म्हणून,जिल्ह्यातील समविचारी पक्ष संघटने च्या तरुण कार्यकर्त्यांनी या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन भाई मोहन गुंड यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!