येडेश्वरी परिवाराच्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाला अलोट गर्दी, येडेश्वरी कारखान्यावर जिल्हाभरातील नागरिक आले एकत्र

केज/प्रतिनिधी

येडेश्वरी साखर कारखाना युनिट नं.१आनंदगाव सा. ता.केज येथे येडेश्वरी परिवाराच्या वतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्नेहमिलन व फराळाचा सोहळा उत्साहात पार पडला.यावेळी खा.बजरंग सोनवणे यांनी सर्वांचे स्वागत करून जिल्हा भरातून एकत्र आलेल्या नागरिकांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
खा.बजरंग सोनवणेयांच्या वतीने येडेश्वरी साखर कारखाना,आनंदगाव येथे दिवाळीच्या पार्श्वभुमीवर स्नेहमिलन व फराळाचा कार्यक्रम आयोजीत केला होता.या आनंदसोहळ्यात बीड जिल्ह्यातील मान्यवर पदाधिकारी,कार्यकर्ते, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.आपुलकी,आनंद, एकताआणि सहभावनेचा हा सोहळा येडेश्वरी परिवाराच्या स्नेहबंधनाला आणखी बळकट करणारा ठरला.कार्यक्रमा दरम्यान परस्पर संवाद,शुभेच्छा विनिमय आणि सहकाऱ्यांच्या मैत्रीपूर्ण गप्पांमुळे वातावरण स्नेह पूर्ण आणि उत्साही बनले.
या प्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणाऱ्या सर्वांचे आभार खा.सोनवणे यांनी मानले.यावेळी खा.बजरंग सोनवणे यांनी उपस्थित ऊस उत्पादकांशी संवाद साधत नवीन पध्दतीने शेती करण्यासाठी सज्ज व्हा,एआय तंत्रज्ञात विकसीत होत आहे. यानूसार आता शेती करावी लागेल.तेव्हा, आपल्याला शेतीतून अधिक उत्पन्न घेणे शक्य होईल.नव्या बदलासाठी सर्वांनी पुढे येणेआवश्यक आहे.
उत्पादन वाढविण्या साठी लागेल ती करायची तयारी ठेवा,कष्ट,मेहनती सोबत योग्य नियोजन देखील आवश्यक आहे. यासाठी कारखान्या कडून वेळोवेळी मार्गदर्शन देखील करण्यात येईल, असेही यावेळी खा.सोनवणे म्हणाले. यावेळी बीड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींची उपस्थिती होती.



