भालगाव येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश

केज/प्रतिनिधी
खा.बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भालगाव ता.केज येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
पक्षाच्या विचारसरणी वर श्रद्धा,जनतेचा विश्वास आणि विकासाची दिशा यांवर विश्वास ठेवून झालेल्या या प्रवेशामुळे पक्ष संघटन अधिक बळकट झाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या प्रवेशामुळे केज तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद अधिक वाढली असून कार्यकर्त्यां मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची नावे अब्दुल सिराज तांबोळी,भगवान शिवचंद्र गिरी ,शिवहार गुरलिंग विभुते, लायक बाशुमियाँ शेख, जब्बार बालुमियाँ शेख ,तय्यब बशीर पठाण,कलिम तासौदिन शेख,हकिम तासोदिन शेख,मसुद इस्माईल शेख,मिया ननौमियाँ शेख,हरीभाऊ शिवचंद गिरी,सुनिल लक्ष्मण सिरसाठ,मयूर उत्तमराव सुरवसे, महादेव बळीराम मोरे आदि उपस्थित होते.