कृषीसामाजिक

सातेफळ गावात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान ; सरपंच व शिवसेना पदाधिकारी यांनी केली पाहणी

केज/प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे केज तालुक्यातील सातेफळ गावात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी सातेफळ ग्रामपंचायत चे सरपंच कृष्णा थोरात यांनी पहाणी केली.

या पाहणीत शिवसेना तालुकाप्रमुख पृथ्वीराज पाटील,केज तालुक्याचे विधानसभा प्रमुख दादासाहेब ससाने, चिंचोली माळी सर्कल मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मालोजी नाना गलांडे, अरुण करपे यांच्यासह सातेफळ येथील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

सर्वांनी मिळून शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान पाहिले व प्रत्यक्ष स्थितीची माहिती घेतली.यावेळी सरपंच कृष्णा थोरात यांनी सांगितले की, सातेफळ गावातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शासनाकडून तातडीने भरपाई मिळावी या साठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

मात्र या लढ्यात गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन आवाज उठवणे आवश्यक आहे. आपण सर्वांनी शासनापर्यंत आपली मागणी पोंहोचवली, तरच शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो असे त्यांनी सांगितले. गावातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनीही शासनाने लवकरात लवकर मदत व नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी केली आहे.

अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान तातडीने नुकसान भरपाई द्यावी, यासाठी ग्रामपंचायत, पदाधिकारी आणि नागरिक यांचे एकत्रित प्रयत्न सुरू आहेत.या वेळी शिवसेनेचे विधानसभा प्रमुख दादासाहेब ससाणे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!