केज येथे गंगामाऊली शुगर मार्फत ऊस पिक परिसंवाद संपन्न

केज/प्रतिनिधी
केज येथे गंगामाऊली शुगर या कारखान्याच्या मार्फत कारखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पुर्वहंगामी ऊस लागवड पद्धतीमुळे ऊस उत्पादनात होणारी वाढ या बाबत माहिती देण्या करीता कृषिभुषण सन्मानित श्री.पांडुरंग आबा आवाड रा. आवाड शिरपुरा यांचे पुर्व हंगामी व सुधारीत ऊस जातींची लागवड पर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या चर्चासत्र कार्यक्रमात श्री.पांडुरंग आबा आवाड यांनी शेतकऱ्यांना पुर्व हंगामी ऊस लागवडी करीता जमीनीची पुर्व मशागत, लागवड हंगाम,सुधारीत ऊस जाती,सरीतील अंतर, खत व्यवस्थापन, एकात्मीक रोग व किड व्यवस्थापन या बाबत सखोल मार्गदर्शन केले. या चर्चासत्रास मस्साजोग, सांगवी, सारणी,पिंपळगव्हाण, शिंदी,काळेगाव, आरणगाव, जाधव जवळा ,कोरेगाव, सावंतवाडी,डोनगाव, सारणी आनंदगाव, सोनीजवळा, चिंचोली माळी ,हादगाव,डोका व कारखाना परिसरातील शेतकऱ्यांनी मोठया संख्येने सहभाग नोंदवला.या चर्चासत्रास गंगामाऊली शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.बी.आय.
मुजावर,मुख्य शेतकी अधिकारी श्री.अविनाश आदनाक,ऊस विकास अधिकारी,ऊस पुरवठा अधिकारी व शेतकी विभागातील सर्व कर्मचारी या उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.वसंत गायकवाड वप्रास्तावीक मुख्य शेतकी अधिकारी श्री.अविनाश आदनाक यांनी केले.यामध्ये त्यांनी प्रमुख मार्गदर्शक पांडुरंग आबा आवाड यांची ओळख व त्यांनी केलेले ऊस शेतीतील सुधारीत प्रयोग या बाबत सखोल माहिती दिली.आभार प्रदर्शनाने चर्चासत्राची सांगता झाली.