
केज/प्रतिनिधी
मौजे उमरी ता.केज येथील टोल नाक्यामुळे स्थानिक जनतेला होत असलेल्या त्रासा विरोधात शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने तीव्र भूमिका घेण्यात आली आहे.तालुका प्रमुख अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली केज तहसील कार्यालयास दिलेल्या निवेदनाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून,तातडीने टोल अधिकार्यांची बैठक घेण्याचे नियोजन सुरू केले आहे.स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार,उमरी टोल नाका चुकीच्या पद्धतीने सुरू करण्यात आला आहे.रस्त्याचे काम अद्याप पूर्ण न होता चढउतार करून टोल वसुलीची घाई करण्यात आल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
शिवाय परीसरा तील वाहनांना कोणतीही सूट न देता थेट टोल आकारला जात असल्याने परिसरातील नागरिकां मध्ये संतापाची लाट उसळली आहे.याच पार्श्वभूमीवर दि.२९ सप्टेंबर रोजी शिवसेना तालुका प्रमुख अशोक जाधव यांच्या नेतृत्वा खाली केज तहसील समोर रस्ता रोको करण्याच्या इशाऱ्यासह निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनाची केज तहसीलदार राकेश गिड्डे यांनी गांभीर्याने दखल घेत तात्काळ टोल अधिकार्यांची बैठक बोलावून समस्ये वर तोडगा काढण्याचे नियोजन सुरू केले आहे.
प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शिवसेनेने प्रस्तावित रस्ता रोको आंदोलन तात्पुरते दहा दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णयघेतला आहे.मात्र टोल नाका बंद करण्याचा निर्णय लवकर घेतला गेला नाही तर दि.१० ऑक्टोबर २०२५ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र रस्ता रोको व आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा देण्यात आला आहे.या घडामोडींमुळे उमरी टोल नाक्यावरील परिस्थितीवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मागण्या व प्रशासनाचा पुढील निर्णय यावरच पुढील घडामोडी ठरणार आहेत.