
केज/ प्रतिनिधी
केज तालुक्यातील कानडीमाळी गावासह तालुक्यात ढगफुटी झाली आहे.अति मुसळधार पाऊस झाला रात्री आणि सकाळी झालेल्या संततधार पावसामुळे नदी,नाली, ओढ्याला महापुरआला त्यामुळे केज,कानडी माळी विडा रस्ता बंद पडला.त्यामुळे सरकारी कर्मचारी,शाळकरी मुले,गावकरी दुपार पर्यंत अडकून पडले होते.
सोयाबीन पीक कापणीला आलेले होते तेही ढगफुटीपावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले शेतातून पुरासारखे पाणी वाहत होते पुराचे पाणी शेतातून वाहत होते. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत सोयाबीन हे मुख्य पीक आहे. कानडी माळी गावासह साबला ,धर्माळा, लहुरी, तरनळी, येवता ,विडा, कासारी, उमरी सह केज तालुक्यात मुसळधार पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले तरी सरकारने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.