ना.पंकजाताई मुंडें चा सावरगाव घाट येथे दसरा मेळावा हा रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा ठरला,सुरज भैय्या घुले यांनी केली तीन हजार भाविकांसाठी केली भव्य भोजन व्यवस्था, येवता जिल्हा परिषद सर्कल मधून 200 गाड्यांचे नियोजन

केज/प्रतिनिधी
येवता जिल्हा परिषद सर्कल मधून ना. पंकजाताई मुंडे यांच्या सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यासाठी यावर्षी भव्य नियोजन करण्यात आले.भगवान भक्ती गडावर दरवर्षी प्रमाणे यंदाही प्रचंड जनसागर उसळला होता.
यामध्ये पहिल्यांदाच भाजपचे युवा नेते सुरज भैय्या घुले यांनी जवळ पास तीन हजार भाविकां साठी जेवणाची व्यवस्था करून वेगळाच ठसा उमटवला आहे.आपल्या सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यां बरोबरच इतर भाविकांसाठीही त्यांनी उत्कृष्ट जेवणावळ उभी केली होती.तसेच यावेळी 150 ते 200 गाड्यांचे प्रभावी नियोजन करून भाविकांच्या ये-जा व्यवस्थेत मोठा दिलासा दिला.
यंदाचा दसरा मेळावा हा रेकॉर्डब्रेक गर्दीचा ठरला.नेहमीच ना. पंकजाताईं मुंडे च्या कार्या वर प्रचंड निष्ठा ठेवणारा चेहरा म्हणून सुरज भैय्या घुले पुढे येत आहेत. सातत्यपूर्ण सामाजिक व राजकीय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग सुरज भैय्या घुले यांचा असतो संघटनात्मक टीमवर्क ही त्यांची कार्यशैलीलोकांच्या मनात घर करून राहिली आहे.आता हा तरुण पुढे कोणती संधी मिळवतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.