अंबाजोगाई येथील पत्रकार प्रशांत मस्के यांचा समाजकार्यास प्रोत्साहन देऊन वाढदिवस उत्साहात साजरा.

अंबाजोगाई/प्रतिनिधी
दैनिक बीडसत्ता वृत्तपत्र चे अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी प्रशांत रघुनाथ मस्के यांच्या वाढदिवसा निमित्त विविध क्षेत्रातून शुभेच्छा पत्रकार प्रशांत रघुनाथ मस्के यांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये गेल्या सात वर्षांपासून निर्भीड अशी पत्रकारिता केली आहे आणि करत आहेत त्यांच्या लेखणीने दडलेले सत्य बाहेर काढून वाचा फोडण्याचे काम केले आहे.
त्यांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये उत्कृष्ट अशी पत्रकारिता करताना त्यांच्या निर्भीड पत्रकारिता कार्यामुळे त्यांना पद्मपाणी राज्य स्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात सन्मानित करण्यात आले आहे.संघर्ष भूमी तालुका अंबाजोगाई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त एक एप्रिल ते चौदा एप्रिल पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वा सार्वजनिक जयंती महोत्सव २०२५ संघर्ष भूमी वरील होणाऱ्या विविध कार्यक्रमाचे वृत्तांकन लोकप्रिय दै. बीडसत्ता वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध केल्या बद्दल पत्रकार प्रशांत रघुनाथ मस्के यांना संघर्ष भूमीच्या वतीने संविधान आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले आणि त्यांच्या निर्भीड आणि उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या त्यांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वत्र क्षेत्रातून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.