प्रशासकीयसामाजिक

जोला गावावर आलेले अस्मानी संकट तलाठी रविंद्र गायकवाड यांच्या सतर्कतेने टळले 

केज/प्रतिनिधी

शनिवार दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी केज तालुक्यातील जोला शिवारातील रक्ताळीचा माळ परिसरातील पाझर तलावाच्या भिंती वरुन पाणी वाहत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले आता तलाव फुटणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती.शुक्रवार दि. २६ सप्टेंबर रोजी दुपारी सुरू झालेला जोरदार पाऊस शनिवार पर्यंत सुरूच होता यामुळे रक्ताळीचा माळ शेतातील पाझर तलाव तुडुंब भरूनफुटण्याच्या मार्गावर आहे हि बाब नागरिकांच्या लक्षात येताच सदरील माहिती गोविंद नवनाथ ढाकणे, भगवान करंजकर व आसाराम ढाकणे यांनी जोला तलाठी सज्जाचे तलाठी रविंद्र गायकवाड यांना दिली.

सदरची माहिती मिळताच गायकवाड यांनी जोला गावातील तलावाकडे धाव घेऊन तातडीने तलावाचा सांडवा फोडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले स्वतः हातात टिकाव घेऊन खोदण्यासाठी सुरवात केली त्यांच्या मदतीला गोविंद ढाकणे,आसाराम ढाकणे,गोविंद सारुक व बाळासाहेब बिक्कड होते परंतु माणसांच्या हाताने धोका टळला पण संपूर्ण सांडवा फोडणे शक्य नाही असे लक्षात येताच मुरली बप्पा ढाकणे यांनी जेसिबी मशिन बोलावुन घेत तब्बल सात तास मशिन चालवुन सांडवा खोल करून घेत मौजे जोला गावावरील व परिसरा वरील मोठा धोका तलाठी रविंद्र गायकवाड यांच्या सतर्कते मुळे टळला आहे.

ही संपूर्ण मोहीम तलाठी रविंद्र गायकवाड,भगवान सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष मुरलीधर बप्पा ढाकणे, महसूल सहाय्यक बाळासाहेब बिक्कड, गोविंद ढाकणे,अशोक जेधे,आसाराम ढाकणे, अविनाश सारुक, सखाराम ढाकणे, भगवान करंजकर, गणेश ढाकणे,गोविंद सारुक,रामेश्वर ढाकणे, विनायक ढाकणे, ज्योतीराम ढाकणे, तुकाराम सारुक यांच्या सह गावकरी यांनी यशस्वी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!