आम आदमी पार्टी केज तालुका कार्यकारिणी जाहीर ,अॕड.दिनेश बिक्कड तालुकाअध्यक्ष तर ईश्वर सारुक यांची उपाध्यक्ष म्हणून निवड.

केज/प्रतिनिधी
आम आदमी पार्टीच्या (AAP) बीड जिल्हा पातळीवरील संघटने च्या बळकटीसाठी आणि पक्षप्रमुख श्री. अरविंद केजरीवाल यांच्या विचारसरणीने प्रेरित होऊन,तसेच महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष श्री. अजित फटके पाटील यांच्या आदेशा नुसार, केज तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
या कार्यकारिणीत पुढील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.तालुका अध्यक्ष अॕड. दिनेश बिक्कड, उपाध्यक्ष ईश्वर सारुक, सचिव विजय वनवे,सह सचिव अक्षय शाहरुख, मीडिया प्रमुख शशिकांत आंधळे,संघटनमंत्री अमोल वनवे, सहसंघटन मंत्री वैभव चाटे,अल्प संख्याक विभाग प्रमुख आबा हाके,शेतकरी आघाडी प्रमुख श्रीनाथ बिक्कड, विद्यार्थी आघाडी प्रमुख अमोल देशमुख यावेळी आम आदमी पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे, जिल्हा उपाध्यक्ष रफिक पठाण व जोशी,बीड शहरप्रमुख सय्यद सादेक, अल्पसंख्याक विभाग प्रमुख नासेर मुंडे,मीडिया प्रमुख रामभाऊ शेरकर,तसेच बाजीराव ढाकणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
केज तालुक्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी प्रभावी पणे सर्वसामान्यांचे प्रश्न उचलून शिक्षण आरोग्य विद्यार्थी शेतकरी यांचे प्रश्न घेऊन काम करेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. दरम्यान वरील पदाधिकारी यांचे सर्वत्र अभिनंदन होत असुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.