प्रशासकीय
खासदार बजरंग सोनवणे यांची ग्राहक व्यवहार,अन्न व सार्वजनिक वितरण विषयक संसदीय समिती वर फेरनिवड

केज /प्रतिनिधी
बीड जिल्ह्याचे विद्यमान खासदार श्री.बजरंग बप्पा सोनवणे यांची ग्राहक व्यवहार,अन्न व सार्वजनिक वितरण विषयक संसदीय समिती वर देशातील नागरिकांच्या अन्नसुरक्षा, अन्नधान्य वितरण,सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS), ग्राहकांचे हक्क,किंमत नियंत्रण व पोषण सुरक्षा यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर काम करणाऱ्या समितीवर नियुक्ती जाहीर झालेली आहे.
या समितीच्या माध्यमातून शेतकरी, अन्नधान्य उत्पादक, ग्राहक व सामान्य जनता यांच्याशी निगडित धोरणे ठरविण्यात येतात.त्यामुळे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या सक्रिय व परिणामकारक कार्यक्षमते मुळे जनतेच्या अपेक्षांना न्याय मिळत राहील अशा भावना यावेळी बोलताना बजरंग बप्पा सोनवणे यांनी व्यक्त केल्या.