राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळेचा पालक मेळावा उत्साहात संपन्न.

- केज/प्रतिनिधी
केज शहरातील स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज संचलित राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेत दरवर्षीप्रमाणे पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय ॲड. राजेसाहेब देशमुख उर्फ पापा यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून केज शहरातील ज्येष्ठ साहित्यिक तथा सेवानिवृत्त शिक्षक श्री.हनुमंत घाडगे यांची उपस्थिती होती.मंचावर संस्थेचे सचिव श्री.जी.बी. गदळे,सामाजिककार्यकर्ते प्रा.हनुमंत भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बी.बी.चाटे यांची उपस्थिती होती.सर्वप्रथम आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर उपस्थित पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रगती बाबत सूचना व्यक्त केल्या. यामध्ये बहुतांश पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.पालकांमधून दिलीप बनसोडे यांनी प्राथमिक स्वरूपात आपले मत मांडले. पालकांच्या सूचना बाबत संस्थेचे सचिव श्री.जी.बी. गदळे यांनी संस्थेच्या वतीने उत्तर दिले.उपस्थित हनुमंत घाडगे सर यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत,अभ्यासा बाबत महत्त्वाच्या सूचना केल्या.
महापुरुषांचे चरित्र वाचून आदर्श घ्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.श्री.हनुमंथ भोसले सर यांनीही उपस्थित पालकांना शाळेतील अभ्यास वेळेवर करणे याबाबतीत सूचना केल्या. अध्यक्षीय भाषणात ॲड . राजेसाहेब देशमुख यांनी शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कायमच आग्रही असते,सर्व तळागाळातील मुलांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी आपण कार्यरत आहोत असे मत मांडले. एकंदरीत शाळेच्या प्रगती बाबत सर्व उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री.व्ही. बी.यादव यांनी तर प्रास्ताविक श्री.जी.बी. डीरंगे यांनी तर आभार प्रदर्शन श्री.जे.आर.मस्के यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.ए.डी. देशमुख,श्री.आर.एस. क्षीरसागर, श्रीमती अनिता जाधव यांनी सहकार्य केले.पालक मेळाव्यास सर्व शिक्षक व पालक उपस्थित होते.