
केज/प्रतिनिधी
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्यागट-गणांच्या आरक्षण सोडतीनंतर आता नगरपालिकांच्या निवडणुकांच्या हालचालींना देखील वेग आला आहे. नगराध्यक्ष पदासाठीची आरक्षण सोडत सोमवारी दि.६ ऑक्टोबर रोजी मंत्रालयात होत असतानाच,राज्य निवडणूक आयोगाने नगरसेवकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रमही जाहीर केला आहे.त्यानुसार दि.८ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यभरातील सर्व नगरपालिकांमध्ये नगरसेवक पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनां नुसार,जिल्हा अधिकाऱ्यांनी प्रत्येक नगरपालिकेसाठी स्वतंत्र उप जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करणेआवश्यक असून,त्यांच्या देखरेखी खाली ही सोडत पार पडणार आहे.या प्रक्रियेत अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय नागरिक, त्यातील महिला तसेच सर्वसाधारण महिला यांसाठी आरक्षणाची सोडत काढली जाईल.
विशेष बाब म्हणजे, नगरपालिकांमध्ये देखील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रमाणेच “पहिली निवडणूक” हा निकष ठेवून चक्राकार पद्धतीने आरक्षण फिरविण्यात येणार आहे.त्यामुळे संबंधित नगरपालिकां तील पूर्वीच्या आरक्षणाचा विचार या वेळेस केला जाणार नाही.राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला आता वेग आला असून, जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगरपालिकां च्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने एकाच वेळी हालचाली सुरू केल्या आहेत.नगरसेवकांच्या आरक्षण सोडतीनंतर नगरपालिकांच्या निवडणुकीचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
मुख्य मुद्दे दि.६ ऑक्टोबरला नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत मंत्रालयात होणार असून ८ ऑक्टोबरला नगरसेवक पदांसाठी राज्यभरात आरक्षण सोडत उप जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आरक्षण सोडत प्रक्रिया पहिली निवडणूक निकषावर चक्राकार पद्धतीने आरक्षण लागू होणार आहे.ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि नियमा नुसार होण्यासाठी राज्य निवडणूकआयोगाकडून काटेकोर व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.